पालघर (संतोष पाटील) : पालघर जिल्ह्यातील जव्हार,मोखाडा,विक्रमगड़ तालुके म्हटले तर अतिदुर्गम भाग अनेक सोयी सुविधां पासून वंचित असा भाग या अविकासला कारण एकच ते म्हणजे लोकप्रतिनिधि आणि शासनाच्या अधिकाऱ्यांची उदासीनता मोखाडा तालुक्यातील पवारपाडा तालुक्याच्या ठिकाणा पासून फ़क्त 3 किमीवर परंतु ह्या जवळच असलेल्या पाड्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष दिसून येते.या पाड्याची लोकवस्ती जवळपास दीडशे ते दोनशेच्या घरात आहे.परंतु पाड्यात ना बोअरव्हेल ना विहीर म्हणून भर दुपारी रणरणत्या उन्हात लहानग्या मूली आणि बायका डोक्यावर हंडे कळशा घेऊन दीड किमी वर असलेल्या खोल दरीतिल पिण्याचे पाणी वाहताना आपल्याला दिसतात.
मोखडा म्हटले तर येथील खासदार चिंतामण वणगा सत्ताधारी भाजपचे,मंत्री विष्णु सवरा भाजपचेच ,पंचायत समिती शिवसेनेकड़े मात्र अस असूनही मोखडा तालुक्यातील अनेक गाव पाडयंतील जनता पिण्याच्या पाण्यासाठी तरसते आहे.पाण्याचे स्त्रोत नैसर्गिक रित्या प्रत्येक ठिकाणी आहेत.पण शासन आणि राज्यकर्त्यांची उदासीनता या मुळे येथील पाण्याची समस्या आजही कायम आहे.खोल दरया असलेल्या ठिकाणी पाणी आहे.मात्र पाणी पुरोवठा योजना राबविल्या त्या ऊंच कोरड्यां ठिकाणी लाखो रुपये खर्च करूनही लोकांना त्याचा फायदा नाही.परंतु ह्याच योजना राबवून दरीतिल पाणी लिफ्टिंग करुन वर आणता आले असते तर पवारपाड्या सारख्या लोकांना जागेवार पाणी उपलब्ध झाले असते.परंतु नाचता एईना अंगण वाकड़े अशी परिस्थिति शासन आणि राज्यकर्त्यांची असल्याने जनतेला पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे.