मोगरा महोत्सव उत्साहात

0

तळेगावः- तळेगाव दाभाडे गणपती चौक येथील 350 वर्षांपूर्वीच्या शिवकालीन गणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मोगरा महोत्सव व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा पार पडला. त्या निमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. प्रत्येक चतुर्थी दिवशी या मंदिरात विशेष गर्दी पाहायला मिळते.

तळेगावमधील गणेशभक्त वर्षभर या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात. अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त हे गणेश मंदिर पहाटे सहापासून खुले होते. सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला. नंतर सकाळी आठ वाजता गणपती बाप्पाची महापूजा झाली. अंगारकीनिमित्त मंदिरात विशेष सजावट करण्यात आली होती. ही सजावट ओंकार मेढी, शुभण फाकटकर, शुभदा सोनपावले यांनी केली.