मोघम वीज बिलामुळे शेतकरी त्रस्त

0

शेतकरी नेते पायगुडे यांचे निवेदन

पिंपरी : मुळशी तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतीतील पाणी पंपाचे बील भरमसाठ येत आहे. महावितरणतर्फे दर महिन्याला मिटरचे रिडींग होतच नाही, मोघम असे बील दर महिन्याला शेतकर्‍यांना दिले जाते. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून या भरमसाठ वीजबिलामुळे तो आता आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहे, अशी तक्रार वंदे मातरम शेतकरी विकास संघटनेचे अध्यक्ष जनार्दन पायगुडे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील विद्युत उपअभियंता कार्यालयातून शेतकर्‍यांची मोघम वीजबिले दिली जातात. अधिकार्‍यांकडून दर महिन्याला किंवा तीन महिन्याला मीटर रिडिंग केले जात नाही. तसेच घरगुती बिलेही मोघम काढली जातात. यामुळे शेतकर्‍यांना भरमसाठ वीजबील येत आहे. अधिकार्‍यांचा हा मनमानी कारभार थांबावा यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री म्हणून आपण जातीने लक्ष घालून संबंधित अधिका-यांना व्यवस्थित मीटर रिडिंग करून घरपोच वीजबिले द्यावीत असे आदेश द्यावेत.