शहादा: तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथे पारंपरिक लग्नसोहळ्याला फाटा देऊन आहे त्या परिस्थितीला सामोरे जाऊन अत्यंत साध्या पद्धतीने कोळी समाजातील वधू-वरांच्या विवाह सोहळा झाला. यावेळी मोजक्याच लोकांची उपस्थितीसह फिजिकल डिस्टन्िंसग ठेवण्यात आला होेता. याप्रसंगी नवरदेवाचे वडील सुभाष गजमल वाकडे यांच्यातर्फे कर्मचारी संघटनेच्या शहादा येथे प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामास पाच हजार रुपये व पुरूषोत्तमनगर येथील विठ्ठल मंदिरास पाच हजार रुपयांची रोख देणगी देण्यात आली. यावेळी अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या विवाह सोहळ्याला लागणार्या खर्चाची बचत झाल्याने ते पैसे वधू-वरांच्या बँक खात्यात डिपॉझिट करून बचत करण्यात आली.
येथील सुभाष गजमल वाकडे यांचा द्वितीय सुपुत्र संदीप याचा विवाह हिरालाल तुळशीराम सोनवणे (रा. धुळे, ह.मु.नंदुरबार) यांची सुकन्या चि.सौ.कां. आश्विनी हिच्याशी 2 मे रोजी पुरुषोत्तम नगर येथे मोजक्याच लोकांच्या साक्षीने पार पडला. यावेळी सुरेश जाधव यांनी सर्वप्रथम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजीबाबत उपस्थितांना माहिती दिली. नियोजित वर-वधुच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी समाजातील लग्नाच्या तारखा पुढे न ढकलता सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून विवाह लावावेत, असे आवाहन करण्यात आले.
Next Post