जळगाव । जळगाव जिल्हा पोलिसदलास यंदा दोन राष्ट्रपतीपदकाचा बहुमान प्राप्त केला आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत सहाय्यक फौजदार मोजोद्दीन शेख कादर आणि धनराज नामदेव शिंदे या दोघांचे नाव स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला जाहीर झाले असून राष्ट्रपतीपदकाचे मानकरी ठरलेल्या दोघांचे पोलिसदलातर्फे कौतूक करण्यात आले. पोलिसदलात कार्यरत असतांना उल्लेखनीय कामगीरी बजावणार्या पोलिस अधिकारी कर्मचार्यांना राष्ट्रपतीपुरस्काराची घोषणा होते.
पोलिस कर्मचार्यांची अशी आहे कामगिरी…
यंदा जिल्हापोलिस दलास दोन राष्ट्रपतीपदक मिळणार असुन त्यात लाचलूचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत सहाय्यक फौजदार मोजोद्दीन शेख कादर, आणि दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत कर्मचारी धनराज नामदेव शिंदे यांना स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर झाले असुन दोघांना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत प्रशासकीय कार्यक्रमा प्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. मोजोद्दीन शेख 16 ऑक्टोबर 1980 जिल्हा पोलिस दलात भरती झाले. आपल्या 36 वर्षे 9 महिन्याच्या सेवेत मुख्यालय, रावेर, मुक्ताईनगर तालूक्यासह शहर वाहतुक शाखा, भुसावळ शहर, भुसाळव बाजारपेठ सह इतर ठिकाणी त्यांनी काम केले, त्यांच्या कार्यकाळात 257 पोलिस रिवॉर्ड, आणि 8 हजार 700 रुपयांचे आजवर रोख बक्षीस मिळालेले आहे. सात वर्षापुर्वी महाराष्ट्रदिनी 2010 रोजी पोलिस महासंचालक पदकाने मोजोद्दीन शेख यांना सन्मानीत करण्यात आले आहे. कुटूंबात वयोवृद्ध आई करीमाबी, पत्नी तबस्सुम मुलगा साजीद, शाहीद आणि मुलगी तकद्दीस फातेमा असा परीवार आहे.
172 रिवार्ड मिळाल
दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत धनराज शिंदे 25 जुलै 1985 मध्ये पोलिस दलात भरती झाले, मुख्यालय, एरंडोल, नियंत्रणकक्ष, वाहतुक शाखा, जिल्हाविशेष शाखा, तालूका पोलिस ठाणे आणि आता दहशतवाद विरोधी पथक एटीसी मध्ये ते कार्यरत असून 33 वर्षाच्या सेवेत उत्कृष्ट कामगीरी केल्या प्रकरणी आजवर त्यांना 172 रिवॉर्ड, 7 हजारांपर्यंतची
रोख बक्षीसे, यांसह जातीय सलोखा कार्यक्रमाअंतर्गत विशेष कामगीरी बजावली आहे.