मोटरसायकची समोरासमोर धडक; एक ठार

0

रावेर । दोन मोटरसायकलचा समोरा-समोर धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत वृत्त असे की, पाल पोलिस आऊट पोष्ट हद्दित मध्य प्रदेश यातील पाडल्या फाटा ते गारग्याआम घाटात मयत सखाराम रीती मानकर हा त्याच्या मोटरसायकलवर पालकडे येत असतांना पालकडून भरधाव वेगाने जाणारी अज्ञात मोटरसायकलने समोरून धडक दिली. यामध्ये सखाराम गंभीर जखमी झाला त्याला उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले.