मोटरसायकलच्या धडकेत दोघे मृत्युमुखी

0

शिंदखेडा । मोटरसायकलच्या समोरासमोर धडकेमूळे झालेल्या अपघातात मृतांची संख्या दोन झाली आहे.अन्य दोन जखमींवर धुळे येथे खाजगी रूग्णालयात उपचार सूरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.जखमी भगवानसिंग गिरासे यांचे धूळे येथिल खाजगी रूग्णालयात ऊपचार सूरू असतांना बुधवारी रात्री उशिरा निधन झाले.बुधवार दि.12 जूलै रोजी येथिल स्टेशनरोड लगतच्या व्ही.के.पाटील शाळेसमोर दूपारी तीनच्या सूमारास हा अपघात झाला होता.दरखेडा ता. शिंदखेडा येथिल शेतकरी श्रावण नारायण पाटील (60 )हे बुधवारी अपघात स्थळीच ठार झाले होते.बुधवारी दि.12जुलै रोजी दूपारी अलाणे ता. शिंदखेडा येथिल शेतकरी भगवानसिंग जगतसिंग गिरासे आणि त्यांचा नातू (मूलाचा मूलगा) दिपपालसिग लोटनसिंग गिरासे हे बाजारासाठी शिंदखेडा येथे आले होते.बाजार करून ते आपल्या पॅशनप्रो या मोटरसायकलने अलाणे येथे परत जात होते.

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
त्याचवेळी दरखेडा येथिल शेतकरी श्रावण पाटील हे सूध्दा आपला लंघाणे येथिल नातू (मूलीचा मूलगा) रामकृष्ण अनिल पाटील (18) यांचे सह एमएच 18 -जी9460 या क्रमांकाच्या मोटरसायकलने दरखेडा येथून शिंदखेडा येथे येत होते. येथिल स्टेशन रोडलगतच्या व्हीके पाटील शाळेजवळ या दोघं मोटरसायकल समोरासमोर एकमेकींना ठोकल्या गेल्या. दोघे गाड्यांवरील दोघे आजोबांसह नातूही चार फूट अंतरावर फेकले गेले.चारही रक्ताच्या थारोळ्यात पडले.यात श्रावण पाटील यांचे जागीच निधन झाले.अन्य तिघे गंभिर जखमी झाले. रात्री उशिरा श्रावण पाटील यांचेवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्च्यात पत्नी तीन मूली,एक मूलगा असा परीवार आहे.गुरूवारी दुपारी भगवानसिंग गिरासे यांचेवर शोकाकूल वातावरणात अलाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.