पाचोरा। तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील शरीफ शकिल पिंजारी (वय – 19) हा 12 रोजी रात्री पाचोरा येथुन खेडगाव (नंदिचे) येथे मोटरसायकल वर जात असतांना खेडगाव शिवारातील हाटेल पांडुरंग गार्डन समोर मोटरसायकल अपघातात त्याचा मृत्यू झाला.
घटणेप्रकरणी पाचोरा पोलिसात अपघाताचे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र मयताची मोटरसायकल घसरल्याने किंवा अज्ञात वाहनाने त्यास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.