वरणगाव। येथून जवळच असलेल्या महामार्गावरील एस्सार पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने दुचाकी मोटरसायकलला मागून धडक दिल्याने वरणगाव नगरपालिकेचा कर्मचारी जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना 31 रोजी रात्री 9.30 वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या विरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जखमीला जिल्हा रुग्णालयात केले दाखल
सोनू राजू उजलेकर (वय 27) सोबत गोविंदा फकीरा लोहरे (वय 28, दोघे राहणार लहुजी नगर, सिध्देश्वरनगर, वरणगाव) हे दोघे मोटारसायकल क्रमांक एमएच 19 सीबी 9732 पॅशन हिरो होंडा कंपनीची मोटारसायकलवर एशिया महामार्गावरुन मुक्ताईनगरहून वरणगावकडे येत असतांना एस्सार पेट्रोल पंपासमोर मागून कोणत्या तरी अज्ञात वाहनाने भरधाव वेगात मोटारसायकलला धडक दिली. यामध्ये मोटरसायकलवरील दोघे फेकले जाऊन सोनू उजलेकर हा जागीच ठार झाला तर गोविंदा लोहरे हा गंभीर जखमी झाला असता त्याला तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
अज्ञात वाहनधारकांविरुध्द गुन्हा दाखल
सोनू उजलेकर हा वरणगाव नगरपालिकेत सफाई कामगार कर्मचारी होता. संजय आधार पाटील (रा. दर्यापूर) यांच्या फिर्यादीवरुन वरणगाव पोलिसात अज्ञात वाहनाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदिश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रावेंद्र बोंडे, राहुल येवले आदी तपास करीत आहे.