एरंडोल । धरणगाव येथे बाजारासाठी मोटर सायकलने जात असलेला युवक रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे मोटर सायकलसह नाल्यात पडल्यामुळे झालेल्या अपघातात चोवीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. जखमीवर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात गुरूवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास धरणगाव रस्त्यावरील टोळी गावाजवळ झाला. याबाबत पोलिसांनी सांगितले कि आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रवी धारसिंग बारेला (वय-24) हा त्याचा सहकारी काळूरामसिंग बारेला यांच्या बरोबर मोटर सायकल क्रमांक एम.एच.19 ए.बी.082 ने धरणगाव येथे बाजार करण्यासाठी जात होता. टोळी गावाजवळ असलेल्या नाल्याचा त्यास अंदाज न आल्यामुळे तो मोटर सायकलसह नाल्यात पडला.रवी बारेला याच्या डोक्यास जबर मार लागल्यामुळे तो जागीच ठार झाला.तर त्याचा सहकारी काळूरामसिंग बारेला गंभीर जखमी झाला. मयात रवी बारेला हा धायांजय खैरनार यांच्या शेतात कामाला होता. याबाबत रमेश पावरा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून हवालदार नारायण पाटील तपास करीत आहेत.