मोटर सायकल आपघातात एकाचा जागीच मृत्यू

0

अमळनेर। मोटारसायकलला धडक बसल्याने पाळधी येथील माजी पं.स.सदस्य पी.पी.पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी 3 वाजता अमळनेर जळगाव रस्त्यावर मांगीर बाबा टेकडी जवळ घडली. प्रकाश पाटील हे पाडळसरे येथे दारावर आले होते, परत जाताना त्यांची मोटर सायकल क्रमांक (एमएच 19 एटी 5250) ला धडक बसल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला ते जागीच मृत झाले. त्यांना योगेश पाटील यांनी ग्रामीणला आणले डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेचे वृत्त कळताच पोलिस निरीक्षक विकास वाघ, प्रमोद बागडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

मोटर सायकल आपघातात जागीच मृत्यू
यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अदन्यात वहान व वहानचालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयात जिल्हा प्रमुख गुलाब वाघ, जि.प. सदस्य प्रताप पाटील, नगराध्यक्ष सलीम पटेल, अनिल अंबर पाटील, प्रताप शिंपी, संजय पाटील, किरण पवार, राजू माली यांनी भेट दिली प्रकाश पाटील यांच्या मागे पत्न , भाऊ, 1 मुलगा, 1मुलगी असा परिवार असून अंत्ययात्रा 12 रोजी सकाळी 8 वा पाळधी येथून निघेल ते सहकार मंत्री गुलाब भाऊचे जिवलग मित्र होते.