नंदुरबार । कारने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. नंदुरबार-निझर मार्गावर सरवड फाट्यानजीक दि.12 रोजी बुधवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान हा अपघात झाला. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार (क्र.एमएच-20/बीसी-3241)ने मोटारसायकल (क्र.एमएच-15/बीई-3998)ला धडक दिली. या अपघातात मेकॅनिकलचा व्यवसाय करणारा सागर गणेश ठाकरे हा जागीच
ठार झाला.