मोटारसायकलच्या धडकेत जखमी झालेल्या शेतकर्‍याचा मृत्यू

0

रावेर । अज्ञात वाहनाने मोटर सायकलला धडक दिल्यामुळे मुंजलवाडी येथील मोटारसायकलस्वार शेतकर्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवार 25 रोजी घडली. याबाबत रावेर पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील मुंजलवाडी येथील शेतकरी समाधान सांडू महाजन (वय 45) हे शनिवार 24 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास मोटारसायकल क्रमांक एमएच 19 एव्ही 8192 ने मुंजलवाडी कडून रावेर येथे येत असतांना भाटखेडा रोड ने येत असतांना अज्ञात वाहनाने मागून येवून शेतकरी समाधान महाजन यांच्या मोटार सायकलीस जोरदार धडक दिल्यामुळे समाधान महाजन गंभीर जखमी झाले. जखमी होवून ते खाली कोसाळल्यानंतर परीसरातील नागरीक मदतीसाठी धवून आले होते. मात्र अज्ञात मोटारसायकलधारक फरार झाला होता. त्यांचेवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमीक उपचार करून पुढील उपचारार्थ जळगाव येथील दवाखान्यात पाठविण्यात आले. उपचार सुरू असतांना रविवार 25 रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत संदिप अंकात पाटील रा. मुंजलवाडी यांनी रावेर पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीवरुन अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार ज्ञानेश फडतरे व सहकारी करीत आहेत.