जळगाव । जळगाव-कानळदा रोडवर खड्डा चुकविण्याच्या नादात दोन मोटारसायकलींची समोरांसमोर धडक होवून मोटारसायकलवरील तिघे जण जखमी झाले.ही घटना 21 रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघाताबाबत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोटारसायकलींचे नुकसान
पिलखेड येथील अमर रविंद्र चौधरी वय 27 हे आई सुलोचनाबाई रविंद्र चौधरी, मुलगा वेदांत अमर चौधरी वय 3 वर्ष यांच्यासह मोटारसायकल क्रमांक एमएच 19 बीझेड 3686 ने घरी जात असतांना समोरून भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकलचालकाने त्यांच्या मोटारसायकलीला जोरदार धडक देवून घटनास्थळापासून पळ काढला. यात अमर चौधरी, सुलोचना चौधरी, वेदांत चौधरी हे तिघे जखमी झाले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने तिघांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी आज मोटारासायकल चालक अमर चौधरी रा. पिलखेड यांचा खबरीवरून अज्ञात मोटारसायकलचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस कर्मचारी उमेश भांडारकर करीत आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.