चाळीसगाव – रस्त्याने पायी चालणाऱ्या मालेगाव तालुक्यातील ईसमास मोटारसायकल ने धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना १६/८/२०१८ रोजी रात्री ९-४५ ते १० वाजेच्या शहरातील धुळे रोड रेल्वे उड्डानणपुलाजवळ हॉटेल ब्रिज कॉर्नर समोर टॉवर जवळ रस्त्यावर घडली होती त्या जखमीचा धुळे येथे शासकीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मृत्यु झाला होता याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला मोटारसायकल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील विजय आधार देवरे (५७) त्यांच्या गावी जाण्यासाठी चाळीसगाव येथील धुळे रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळील हॉटेल ब्रिज कॉर्नर समोरील टॉवर समोर रस्त्यावर वाहन पकडण्यासाठी पायी जात असतांना १६/८/२०१८ रोजी रात्री ९-४५ ते १० वाजेच्या दरम्यान आरोपी रविंद्र सुपडु जाधव रा सायगाव ता चाळीसगाव याने त्याच्या मोटारसायकलने त्यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाले होते रविंद्र जाधव यांच्यावर येथील देवरे हॉस्पिटल मध्ये उपचार केले तर विजय देवरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णवाहीकेने रात्री धुळे येथे नेण्यात आले शासकीय रुग्णालयात १७ रोजी रात्री १-३० वाजत दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना तपासुन मयत घोषित केले होते.
त्यांना मोटारसायकल ची धडक देवुन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपी रविंद्र सुपडु जाधव रा सायगाव ता चाळीसगाव याचे विरोधात विलास आधार देवरे यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशंला गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास हवालदार राजेंद्र चौधरी करीत आहेत.