चाळीसगाव – तालुक्यातील तळेगाव गावाजवळ 13 रोजी मोटारसायकल अपघातात जखमी झालेल्या धुळे तालुक्यातील जुन्नेर येथील रूपा नारायण आंबे (53) यांचा धुळे येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आज 15 रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जुन्नेर येथील रुपा नारायण आंबे हे 13 रोजी जुन्नेर कडुन न्यायडोंगरीकडे मोटारसायकलवर जात असतांना तालुक्यातील तळेगाव गावाजवळ रोडवर त्यांच्या मोटारसायकलला सकाळी 10-30 वाजेच्या सुमारास अपघात झाल्याने ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर प्रथमोपचार करुन त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना धुळे येथील हिरे मेडीकल कॉलेज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचार सुरु असतांना त्यांचा 13 रोजी दुपारी 3-45 वाजता मृत्यु झाला होता. याप्रकरणी शरद सुका आंबे (24) रा जुन्नेर ता जि धुळे यांच्या खबरीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन तपास कांतीलाल सोनवणे करीत आहेत.