रावेर । तालुक्यातील थेरोळा येथील मोटारसायकल चोरीचा तपास लावण्यास रावेर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी शुक्रवार 22 रोजी मध्य प्रदेशातील दोघांना सापळा रचून अटक करण्यात आली.
थेरोळा येथील मोटारसायकलची केली होती चोरी
तालुक्यातील थेरोळा येथे 17 सप्टेंबरच्या रात्री काशीनाथ तुकाराम पाटील यांच्या घराजवळील हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल (एमएच 19 एटी 6274) अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती. पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदशनाखाली फौजदार प्रवीण निकाळजे नाईक पोलीस महेंद्र सुरवाडे, पोलीस कॉन्स्टेबल विकास पहूरकर, सुरेश मेढे यांनी तपासाची चक्रे फिरवले. मोटरसायकल चोरी प्रकरणी मध्य प्रदेशातील पिप्राण्या (ता. नेपानगर, जि. बुर्हाणपूर) येथील गंगाराम बुरासिंग भीलाला (वय 20), भुरा बिसन भिलाला (वय 21) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली व चोरलेली अशा दोन मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहे.