जळगाव । अजिंठा रस्त्यावरील हॉटेल अमरनाथ जवळून सोमवारी सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुचाकी लंपास केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी दोन संशयिताना अटक केली. त्यांना आज बुधवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. गोरे यांच्या न्यायालयात हजर केेले असता त्यांनी एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील राहूल बळीराम बाविस्कर (वय 31) हा सोमवारी कामानिमित्ताने शहरात आला होता
सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास अजिंठा रस्त्यावरील हॉटेल अमरनाथच्या बाजूला असलेल्या देशीदारू दुकानाच्या समोर त्याने त्याची दुचाकी (क्र. एम.एच. 19 एबी 0426) उभी करून कामासाठी निघून गेला. काही वेळानंतर तो परत आला असता जागेवर दुचाकी दिसून आली नाही. शोधाशोध केल्यानंतरही दुचाकी न मिळाल्याने राहूलने मंगळवारी एमआयडीसी पोलिसात दुचाकी चोरी झाल्याची तक्रार दिली. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी सुभाष मधुकर मराठे (वय 38), कैलास रमेश कोकाटे (वय 29, दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी) या दोघांना मंगळवारी सायंकाळी 6.40 वाजेच्या सुमारास अटक केली. त्यांना बुधवारी न्या. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 1 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.