मोटारसायकल चोरट्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी

0

जळगाव । लोकमान्य रुग्णालयाच्या पार्किंगमधून गेल्या वर्षी मोटारसायकल चोरी झाली होती. या प्रकरणी 7 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी एका संशयिताला बुधवारी अटक केली. त्याला गुरूवारी न्या.के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली आहे. सालारनगर येथील डॉ. मोहसीन शहा वहाब शहा यांची मोटारसायकल (क्र. एमएच- 19, बीई- 8699) गेल्यावर्षी प्रभात कॉलनी चौकातील लोकमान्य रुग्णालयाच्या बाहेरून चोरीस गेली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांनी उज्ज्वल अशोक महाले या संशयिताला ताब्यात घेतले. त्याला गुरूवारी न्यायाधीश कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.