मोटारसायकल चोरट्यास काव्यरत्नावली चौकात अटक

जळगाव । स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीची मोटारसायकल घेऊन फिरणार्‍या एका तरुणाला  काव्यरत्नावली चौकात अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडील मोटारसायकल हस्तगत केली. तर त्याच्याअल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

साहिल खलील खाटीक (वय 20, रा. अमळनेर) हा चोपडा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीचीमोटारसायकल जळगावातील काव्यरत्नावली चौकात घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी कारवाईसाठी रविवारी सकाी पथक तयार केेले. या पथकाने मोटारसायकल चोरट्यास काव्यरत्नावली चौकात पकडून अटक केली. त्याच्याकडील मोटारसायकलबाबत चौकशी केली त्याने एक महिन्यापूर्वी ही मोटारसायकल पाच हजार रुपये किमतीला अमळनेरमधीलअल्पवयीन चोरट्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या अल्पवयीनचोरट्यासही अटक केली. दोघांना तपासकामी चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हा कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, कॉन्स्टेबल उमेशगिरी गोसावी, हरीश परदेशी यांनी केली.