चोरल्या शंभरहून अधिक मोटारसायकली
जळगाव । जळगाव शहरासह अनेक जिल्ह्यांमधून शंभरापेक्षा जास्त मोटारसायकली चोरणारा मोटारसायकल अट्टल चोरट्याला काल कोर्ट चौकातून पोलिस अधिक्षकाच्या विशेष पथकाने सापळा रचून मुसक्या आवळल्या होत्या. त्याने गुन्ह्याची कबुली देवून तब्बल 100 पेक्षा जास्त मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर आज त्याला न्यायमुर्ती घोरपडे यांच्या न्यायालयात हजर केले असता आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अमोल बेलप्पा आखाडे उर्फ अर्जुनकुमार बेलप्पा वाणी (वय-32, रा.वालसांगवी ता. भोकरदन, ह.मु.नशिराबाद) याच्या पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने बुधवारी कोर्ट चौकात सापळा रचून मुसक्या आवळल्या. संशयिताकडून चार मास्टर चावीहस मोटारसायकल विक्रीसाठी लागणारे महत्वाचे कागदपत्र मिळून आले असून ते पोलिसांनी जप्त केले आहेत. दरम्यान, जळगाव शहरातील सहा ते सात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची त्याने कबूली दिली होती.
विशेष म्हणजे आरोपींने लहान वयापासून चोरी करत असून लूना पासून ते महागड्या मोटारसायकली सुद्धा कमी किंमती किंवा भंगार बारात मोटारसायकली विकल्या आहे. आरोपीची कसून चौकशी सुरू असून असजन काही ठिकाणी किंवा साथीदार असल्याची शक्यता आहे. अमोल हा मोटारसायकली चोरी करत असल्यामुळे त्याचे कुटूंबिय हैराण झाले होते. असून मोटारसायकली चोरी प्रकरणी ठिकठिकाणच्या पोलिसात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस पथके मागावर होते. जळगाव जिल्हासह नाशिक, धुळे, बुलढाणा, अकोला, जालना, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील मोटारसायकलीची गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून अमोल याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्याजवळून चार मास्टर चाव्या मिळून आल्या आहेत.