मोटारसायकल चोरणारी जोडी चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात

0

चाळीसगाव। मोटारसायकल चोरीतील संशयित आरोपीची चौकशी केली असता दोघा चोरट्यांनी औरंगाबाद येथून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली चाळीसगाव शहर पोलिसांना दिली असून त्यांनी 1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 5 मोटारसायकली काढून दिल्या आहेत. या प्रकरणी औरंगाबाद व चाळीसगाव येथील दोघा आरोपीना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजार केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या कडून आणखी मोटारसायकली चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी वर्तविली आहे.

दोघांना देवरे हॉस्पिटल जवळून केली अटक
17 जुलै 2017 रोजी शहरात देवरे हॉस्पिटल जवळ 2 इसम चोरीच्या मोटारसायकली विक्री करण्यासाठी आले असल्याची गोपनीय माहिती डीबी पथकाचे हवालदार शशिकांत पाटील, पोकॉ राहुल पाटील, बापूराव पाटील यांना मिळाल्यावरून त्यांनी सापळा रचून आरोपी आरोपी भगवान बाळू पवार (रा. मयूर पार्क औरंगाबाद), अविनाश सुरेश कुमावत (रा केमिस्ट भवन जवळ, चाळीसगाव) या दोघांना देवरे हॉस्पिटल जवळून ताब्यात घेवून त्यांच्याकडून (एमएच 20 एई 2027) मोटारसायकल त्यांनी औरंगाबाद येथून चोरून आणल्याचे सांगितले. त्या दोघांना अटक करण्यात आली असून दोघांची कसून चौकशी केली. दोघांनी औरंगाबाद शहरातून 4 मोटारसायकली व इतर 1 अशा 1 लाख 80 हजार रुपये किमतीच्या होंडा युनिकॉन, होंडा शाईन, बजाज अव्हेंजर, हिरो होंडा पॅशन, व बजाज एक्ससीडी या 5 मोटारसायकली कडून दिल्या आहेत. त्यांचेकडून अजून काही मोटारसायकलीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता शहर पोनि रामेश्वर गाडे पाटील यांनी दिली आहे. पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोनि रामेश्वर गाडे पाटील, सपोनि राजेंद्र रसेडे, पोउनि विजयकुमार बोत्रे, बापू भोसले, शशिकांत पाटील, पो.ना.योगेश मांडोळे, अरुण पाटील, पो.कॉ. राहुल पाटील, बापू पाटील, नितीन पाटील, नरेंद्र नरवाडे, गोपाळ भोई, संदीप पाटील, संदीप जगताप, गोपाल बेलदार, विकास पाटील हे तपास करीत आहे.