मोटारसायकल चोरणारे चौघे अटकेत

0

चाळीसगाव । मोटारसायकल चोरीतील चौघे आरोपी चाळीसगाव शहर पोलीसांनी येवला पोलीस ठाण्यातुन वर्ग केले असुन त्यांच्याकडुन चाळीसगाव येथुन चोरुन नेलेल्या मोटारसायकलसह 50 हजार रुपये किमतीच्या 2 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत आज 10 पर्यंत रोजी त्यांची पोलीस कोठडी संपली असुन त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देवून नाशिक येथील मध्यवर्ती येथे रवानगी करण्यात आली आहे. 10 डिसेंबर 2017 चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनलस पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी माहिती दिली ते म्हणाले की 8 ऑक्टोंबर 2017 रोजी पाटणादेवी रोड चाळीसगाव येथील पोपट गणपत राठोड यांच्या मालकीची हिरो होंडा सीडी डिलक्स (एमएच 19 बीके 6834) ही मोटारसायकल हिरापुर रोडवरील अमृत हॉस्पिटल समोरुन अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती.

चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा वर्ग
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलीस आरोपींच्या शोधात होते. येवला पोलीस स्टेशनला मोटारसायकल चोरीत मनोज राजू जाधव (रा.अंदरसुल ता येवला), अनिल दिनकर गायकवाड (रा.उंबरखेड ता.चाळीसगाव), माधवराव रावसाहेब कोळी, संजय रतन गायकवाड दोघे (रा.लांबे वडगांव ता.चाळीसगाव) हे 4 जण अटक असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बछाव, डीवायएसपी अरविंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडेपाटील, सपोनि राजेंद्र रसेडे, डीबीचे हवालदार बापूराव भोसले, शशिकांत पाटील, पोकॉ गोपाल बेलदार, गोपाल भोई, नितीन पाटील, संदीप जगताप, नरेंद्र नरवाडे, संदीप पाटील (बाप्पा), तुकाराम चव्हाण, विकास पाटील यांनी वरील आरोपींना 7 नोव्हेंबर रोजी येवला पोलीसांच्या ताब्यातून चाळीसगाव पोलीस स्टेशनला वर्ग करुन त्यांना अटक करुन न्यालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

चौकशीनंतर खरी माहिती समोर
पोलीस कोठडीत त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी वरील चोरुन नेलेली मोटारसायकल व हिरो होंडा पॅशन बनावट नंबर लवलेली (एमएच 19 बीएन 2179) ही काढुन दिली चौकशीअंती तिचा खरा क्र. (एमएच 15 डीएफ 6005) असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपींकडुन चोरीच्या अजुन मोटारसायकल मिळुन येण्याची शक्यता पो.नि.रामेश्वर गाडे पाटील यांनी वर्तविली आहे. 10 नोव्हेंबर रोजी आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन पोलिस कोठडी देण्यात आली असून त्यांना नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास हवलदार बापूराव भोसले करीत आहेत. या कारवाईमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.