मोटारीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रेलर घसरला

0

पिंपरी : चुकीच्या दिशेने येणार्‍या कारला वाचविण्याच्या प्रयत्नात लोखंडी शीट घेऊन जाणारा ट्रेलर रस्त्याखाली घसरला. हा अपघात आज सकाळी सहा ते सातच्या दरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोडजवळ घडला.

सुरत येथून लोखंडी शीट घेऊन येणार ट्रेलर (जीजे05 वायवाय 8658) आज सकाळी चुकीच्या दिशेने येणार्‍या कारला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्यावरून खाली घसरला. हा ट्रेलर चिंचवड येथील थरमॅक्स कंपनीत लोखंडी शीट घेऊन जात होता. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. तसेच तो पूर्ण खाली घसरल्याने वाहतुकीला कोणताही अडथळा झालेला नाही.