मोटार चालकाकडून गावठी कट्टा जप्त

0
सांगवी : गावठी कट्टा व एक काडतुस बाळगणार्‍या मोटार चालकाला सांगवी पोलिसांनी अटक केले. ही कारवाई शुक्रवारी केली. उमेश सुरेश पवार (वय 29,  रा. येरवडा) असे अटक केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई दीपक गुणवंत पिसे (वय 28) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी पवार हा एक गावठी कट्टा व एक काडतूस घेऊन सांगवी भागात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व एक काडतुस जप्त करून त्याला अटक केली. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.