मोटार वाहन दस्तावेजांचे होणार डिजिटायझेशन

0

वाहतूक पोलिसांच्या त्रासापासून होणार सुटका
नवी दिल्ली । वाहतूक पोलिसांकडून होणारा त्रास टाळण्यासाठी आता केंद्र सरकाने आणखी एक डिजिटल पाऊल उचलण्याचा प्रस्ताव आखला आहे. वाहनधारकाला अपुर्‍याशा वाहनाच्या कागदपत्रांमुळे पोलिसांकडून विविध प्रकारचा जाच सहन करावा लागतो. मग ते आरसी बुक असो, किंवा पियुसी, अथवा लायसन्स. याची ओरिजन कागदपत्रे सहसा आपल्याचजवळ नसतात.

त्यामुळे झेरॉक्स कॉपी किंवा तत्सम ट्रू कॉपी तपासून कधीकधी पोलिस वाहनधारकाला सोडून देतात मात्र अनेकदा कित्येकांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. या सर्वांवर जालीम उपाय म्हणून केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल करण्याच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही सर्व कागदपत्रे आता डिजीटल स्वरुपात उपलब्ध होणार आहेत. गाडी क्रमांंक डायल केल्यास तात्काळ याची डिजीटल कॉपी पहावयास मिळणार आहे.