मोठा वाघोदा लोकनियुक्त सरपंच अपात्र

सावदा : मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बु.॥ ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मुकेश रामदास तावडे यांना अपात्र ठरवले आहे. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य मुबारक अली तडवी यांनी तक्रार केली होती.

मुदतीत सादर केले नाही प्रमाणपत्र
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत मुकेश रामदास तावडे हे लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाले होते मात्र त्यांनी सहा महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असताना ते सादर केले नसल्याने ग्रामपचांयत सदस्य मुबारक अली तडवी (रा.वाघोदा) यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने त्यांनी तावडे यांना अपात्र केल्याने लोकप्रतिनिधींच्या गोटात खळबळ उडाली आहे.