सावदा : भरधाव मारोती अल्टो कारने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत मोठे वाघोदा येथील केळी कामगार जागीच ठार झाला. सावदा सावदा-फैजपूर मार्गावर असलेल्या जे.के.स्टील जवळच शुक्रवार, 18 रोजी रात्री घडला. अपघाताची माहिती कळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली. रशीद अहमद तडवी (36, रा.मोठे वाघोदा, ता.रावेर) असे अपघातात ठार झालेल्या केळी कामगाराचे नाव आहे.
अल्टोचा कट लागल्याने अपघात
केळी मजुरीचे काम करणारा रशीद तडव हा जेवणाचा डबा घेण्यासाठी फैजपूरकडे मोटारसायकल (एम.एच.19 बी.जे.4378) ने जात असताना सावदाकडून येत असलेल्या अल्टो कार (एम.एच.19 जी. 6769) चा कट लागून धक्का लागल्याने तडवी हे गंभीर जखमी होवून ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अपघातातील वाहने पोलिसांनी जप्त केले आहे. अधिक तपास सहा.निरीक्षक देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.