मोठी दुर्घटना: आयशर पलटी झाल्याने रावेर तालुक्यातील १५ जण जागीच ठार

0

रावेर  : पपईने भरून जाणारी आयशर गाडी पलटी झाल्याने १५ जण जागीच ठार झाल्याची घटना किंनगाव जवळ घडली.घटना स्थळी नागरीकांची एकच गर्दी झाली असून उप विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे देखील स्पॉटवर पोहचले आहे.

या बाबत वृत्त असे की नेर (धुळे) येथून पपईने भरून आयशर रावेरला येत असतांना किंनगाव नजीक मोठा अपघात झाला. पपईने भरून मजूर घेऊन जाणारी आयशर पलटी झाल्याने १५ जण जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. मयत सर्व रावेर तालुक्यातील आभोडा के-हाळा व रावेर शहरातील असल्याचे वृत्त आहे. गाडीवर एकूण २१ जण होती दोन गंभीर जखमी असून त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात नेले आहे.