मुंबईः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. कॉग्रे, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याने राज्यात प्रभावी विरोधी पक्ष म्हणून फक्त भाजपकडेच बघीतले जात आहे. मनसेची भुमिका अद्याप पर्यत जाहिर होवू शकलेली नाही. ठाकरे घराण्यातील मुख्यमंत्री झाल्याने राज ठाकरे हे सरकारच्या बाजूनेच राहतात की विरोधकाची भूमिका बजावतात याकडे सार्या राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची गुप्त भेट झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरोधात भाजपसोबत जाण्याची राज ठाकरे भूमिका घेणार की काय? याबाबतचे प्रश्न निर्माण झाले आहे.
आज मंंगळवारी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. 2014 पूर्वी राज ठाकरे यांनी भाजपला समर्थन केले होते. मात्र त्यानंतर त्यांची भूमिका बदलली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला त्यांची जोरदार विरोध केले. आता पुन्हा ते भाजपशी मैत्री करणार का? हे आगामी काळात दिसेल.