जळगाव – कोरोनाची दहशत जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असून गेल्या चोवीस तासात जळगाव जिल्ह्यात एकूण 39 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत.
जळगाव जिल्ह्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहरात आढळले आहेत ज्यांची संख्या 17 आहे. त्यानंतर भुसावळ शहरात 9 रुग्ण आढळले आहेत. अमळनेर येथे 1 चोपडा येथे 3 एरंडोल येथे 4 चाळीसगाव येथे 5 असे कोरडे आढळून आले आहेत.