मोठी बातमी: नीट, जेईई परीक्षा नियोजित वेळेतच होणार: सुप्रीम कोर्ट

0

नवी दिल्ली: कोरोनामुळे यावर्षी विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यातच नीट आणि जेईई परीक्षा वेळेत होणार की पुढे ढकलण्यात येणार याबाबत संभ्रमावस्था होती. मात्र नेट, जेईईची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. परीक्षा वेळेतच होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सप्टेंबर महिन्यात या परीक्षा नियोजित आहेत. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

विद्यापीठांच्या परीक्षेबाबत अद्यापही कोणतेही निर्णय झालेले नाही. हे प्रकरण देखील न्यायालयात गेले आहे. यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.