अकोला । सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवारांच्या वादग्रस्त संवादाच्या 26 ऑडिओ क्लीप माझ्याकडे आहेत. यातून मोठा भ्रष्टाचार समोर येणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. अकोल्यात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे, भाजप आमदार अनिल गोटेंनी या क्लीप आपल्याला पुरविल्याचेही चव्हाणांनी सांगितले.
सरकारचेच मोपलवारांना अभर
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, तेलगी घोटाळ्रात जामीनावर बाहेर असलेल्या मोपलवाराना मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाची जबाबदारी दिली. आमदार अनिल गोटेंनी मोपलवारांच्या 26 ऑडिओ क्लीप मला दिल्या. भाजप सरकार मोपलवारांवर कारवाई करत नसल्याने, त्यांनी माझ्याकडे या क्लीप सोपवल्याचा, दावाही चव्हाण यांनी यावेळी केला.
आ. अनिल गोटेंकडून दुजोरा
पृथ्वीराज चव्हाण रांना 26 नव्हे तर मोपलवारांच्रा गैरव्यवहाराच्या संभाषणाच्या 35 क्लिप्स दिल्या आहेत , असे सांगत आ. अनील गोटे म्हणाले की, दिल्लीत या मुद्द्यावर मी पत्रकारांना माहिती दिली होती , त्यावेळी चव्हाण मुख्यमंत्री होते. तेच माझ्याकडे या मुद्द्यावर बोलायला आले होते.जी कागदपत्रे मी पत्रकारांना दिली होती तीच त्यावेळी चव्हाणांना दिली होती. मुख्यमंत्रीपदाच्या काळातच चव्हाणांनीही मोपलवारांना ‘ क्रीम पोस्ट’ दिलेल्याच होत्या. कोकणचे विभागीर आयुक्तपद, एमआरडीसीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपद; ही पदे त्यांना आघाडी सरकारच्याच काळात मिळाली होती. या क्लिप देऊनही मोपलवारांची आघाडी सरकारने चौकशी केलेली नव्हती. त्यामुळे चव्हाण अकोल्यात आज जे बोलले ते खरे आहे, मात्र, ते आजच का बोलले हे मलाही सांगता येणार नाही, असे आ. गोटे रांनी स्पष्ट केले. मोपलवारांनी रायगड व अलिबाग भागात म्हात्रे नावाने शेकडो एकर शेतजमिन खरेदी त्याच काळात केलेली आहे. हेही मी सांगितले होते. ती संधी मोपलवारांना आघाडी सरकारच्याच काळात मिळाली होती, असेही आ. गोटे रांनी सांगितले.