मुंबई । मुंबईतील मोठ्या प्रकल्पांना पर्यावरण विषयक परवानग्या देण्यासाठी पालिकेने पर्यावरण कक्ष कार्यान्वित केला आहे. या कक्षाद्वारे 20 हजार चौरस मीटर ते दीड लाख चौरस मीटर एवढे क्षेत्रफळ असणार्या बांधकाम प्रकल्पांना मुंबई स्तरावर परवानगी मिळविणे शक्य होणार आहे. ’इज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत विविध व्यावसायिक परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, हे या कक्षाचे मुख्य उद्देश आहे. यापूर्वी दिल्लीतील केंद्रीय पर्यावरण खात्याच्या परवानगी मिळत होत्या.
मात्र, आता त्या मुंबईतूनच दिल्या जातील, अशी माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे.’इज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत व शासनाद्वारे देण्यात आलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार महापालिकेच्या स्तरावर ’पर्यावरण कक्ष’ सुरु करण्यात आला आहे. मोठ्या बांधकाम प्रकल्पांना पर्यावरण विषयक परवानगी देण्याबाबत पडताळणी आणि त्याचा अहवाल देण्याचे अधिकार या कक्षाला दिले.