मोठ्या फरकाने माझा विजय होईल-श्रीनिवास वनगा

0

पालघर-भाजपचे पालघर येथील खासदार चिंतामण वनगा यांचा निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज पोटनिवडणूक होत आहे. सकाळपासून मतदानास सुरुवात झाले आहे. शिवसेना व भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरली आहे. शिवसेनेकडून दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा तर भाजपकडून राजेंद्र गावित लढत आहे. दरम्यान आज सकाळी श्रीनिवास वनगा यांनी कुटुंबीयासहीत मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर त्यांनी या निवडणुकीत आपला मोठ्या फरकाने विजय होणार असल्याचा दावा केला आहे.

वडिलाच्या निधनानंतर भाजपने हात सोडला मात्र शिवसेनेने आमच्या कुटुंबियांना आधार दिल्याची प्रतिक्रिया श्रीनिवास वनगा यांनी दिली.