हडपसर । मोडक इंटरनॅशनल स्कूलतर्फे स्वातंत्र्यदिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य मिळवून देणार्या सर्व हुतात्म्यांना तसेच देशासाठी बलिदान देणार्या स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र श्रद्धांजली वाहण्यात आली.
सैनिकांच्या कुटुंबीयांचा या देशाला अभिमान आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून मोडक इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गाणी, नाटक अशा विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात आले. त्यावेळी उपस्थित वडकी गावातील संरपच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ नागरिकांनी व प्राचार्या वंदना खरात तसेच शिक्षकांनी मुलांचे कौतुक केले.