तळोदा। स्वच्छ भारत अभियानातर्गत जिल्हातील विविध स्तरावर प्रयत्न होत असताना काही ठिकाणी दिखावू अभियान राबविले जाते.मात्र तळोदा तालुक्यातील मोडगांव यास अपवाद आहे. घनकचरा व्यवस्थान करणारे पाहिले गाव ठरले असून पेसा अंतर्गत विविध विकास कामे राबविण्यात येत असून एक आदर्शगाव म्हणून नावारूपास येत आहे.स्वच्छ भारत अभियान राबवून सर्वत्र स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात असताना अनेक शहरी भागात देखील अस्वच्छता दिसते. या गावात घनकचरा व्यवस्थापन सुरळीत सुरू असून याबाबत प्रशासनाचे देखील प्रोत्साहन मिळाले आहे.
100 टक्के हागणदारीमुक्त गाव
या गावात सार्वजनिक शौचालय 1 आहे.100टक्के हागदांरीमुक्त गाव आहे.याठिकाणी300 च्या वर लोकानीं शौचालय बांधून स्वच्छ भारत मिशन योजनेचा लाभ घेतला. मागील वर्षी राज्यभरात वृक्ष लागवड हाती घेण्यात आली होती. यावेळी सर्वत्र वृक्ष लागवड केली गेली मात्र या गावात स्वयंमस्फूर्तीने दरवर्षी लागवड नुसती केली जात नाही तर त्याची दररोज पाणी देऊन निगा राखली जाते. यागावात रस्त्याचा दुतर्फा केलेली आकर्षक वृक्ष लागवड लक्ष वेधून घेते.
गावाच्या स्वछतेसाठी, उपसरपंचाचा पुढाकार
गावातील सार्वजनिक शौचालय व मुतारी दर आठ दिवसात नियमित साफ केली जाते. यावेळी स्वतः उपसरपंच आनंद चौधरी याप्रसंगी हातात पाण्याची नळी व झाडू घेऊन सफाई करतात. तसेच वेळोवेळी वाढ जोमाने होण्याकरीता वृक्षांची योग्यरीत्या छाटणी देखील स्वतःच करतात गांव शेजारी शिवारात जाण्यासाठी नाला सतत अडचणींचा ठरत होता.यावर शासनावर विसंबून न राहता स्वखर्चाने जेसीबी लावून हे काम पूर्ण केले.
ग्रामपंचायत स्वतःच करते विकास कामे
सदर काम हे 14 वित्त आयोग किंवा पेसा निधी येतो त्यातून जे विकास कामे केली जातात. ती कुठल्याही ठेकेदाराला देत नाहीत. ते काम स्वत: ग्रामपंचायत करते ते काम करून जो नफा रहातो त्यातून लोक उपोयोगी काम करतात.काही वर्षापूर्वी या गावात सर्वात मोठी समस्या होती ती म्हणजे पाणी ,मात्र आता पाण्याची दोन बोअरवेल आहेत पण नियोजन नव्हते, आता एका बोअरवर 2 वाँल आणि दुसर्या बोअरवर 3 वाँल ठेऊन प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवले जाते.