तळोदा। तालुक्यातील मोड गावातील काही भाग गेल्या महिना भरा पासून विद्युत जनित्र जळाल्याने अंधारात आहे. गावातील नागरीकांनी वीज वितरण कंपनीकडे नवीन कनेक्सनसाठी लागाणारी डीमांडनोट भरून सुध्दा नवीन मीटर बसविण्यात आले नाहीत.
ह्या भागातील नागरीकांनी आकडीमुत्त करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला असता त्याला विज वितरण कंपनीच्या अधिकर्यांकडून त्याला प्रतिसाद मिळत नाही असा आरोप या भागातील नागरीकांकडून करण्यात येत आहे. याभागातील विद्युत जनित्र महिना भरात पाच दा जळाले आहे. बसविण्यात येणारे विद्युत जानित्राचा दर्जा चांगल्या प्रतीचा नसल्याने बसविल्यानंतर काहीतासात विद्युत जनित्र जळते यामुळेचा भागातील नागरीक पावसाळ्या पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी भटकंती करावी लागते. वेळप्रसंगी अशुद्ध पाणीच्या वापर करावा लागतो. यामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे डांस मच्छर यांच्या प्रादुभाव वाढून नागरीकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोड गावातील नागरीकांनी तळोदा तहसिलदार यांना लेखी निवेदन देवू गावात चांगल्या प्रतीचे विद्युत जनित्र बसविण्यात यावे अशी मागणी केली आहे.