बारामती । राज्याचा आरोग्यविभाग, पुणे जिल्हापरिषद, अंधत्व निवारण सोसायटी व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रूग्णांशी संवाद साधला.
ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांवर मोतीबिंदूची विनामुल्य शस्त्रक्रिया करून त्यांना नवदृष्टी बहाल करण्याचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पवार यांनी यावेळी केले. या शिबीरात डॉ. तात्याराव लहाने या विश्वविख्यात डॉक्टराने शस्त्रक्रिया केल्या. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार अॅड. वंदना चव्हाण, डॉ. रागिनी पारे याप्रसंगी उपस्थित होत्या.