निंभोरा। येथील कै. गिरधर शेठ फ्रूटसेल सोसायटीमध्ये 29 रोजी मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीर पंचायत समिती दिपक पाटील, सुनील कोंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सागर चौधरी यांच्या संयुक्त प्रयत्न आणि कांताबाई नेत्रालय यांच्या सहकार्याने मोतीबिंदू आणि शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.
अध्यक्षस्थानी खिर्डी येथील माजी प्राचार्य बी.आर. पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, तालुकाध्यक्ष सोपान पाटील, चत्रभुज खाचणे, सरपंच डिगंबर चौधरी, कांडवेलचे रविंद्र पाटील, राजीव बोरसे, दस्तगीर खाटीक, स्वानंद कृषी गटाचे अध्यक्ष गिरीश नेहेते यांसह मान्यवर उपस्थित होते. कांताबाई फाऊंडेशनतर्फे तालुक्यामध्ये 100 शस्त्रक्रिया झाल्या असून सदर शिबिरासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 120 रुग्णांची तपासणी करण्यात आली.त्यापैकी 12 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.