पिंपरी : गणपतीसाठी खव्याचे मोदक, उकडीचे मोदक, तळलेले गूळ, खोबर्याचे मोदक, साखरेचे मोदक, आंब्याचे मोदक, काजू मोदक, ओल्या खोबर्याचे मोदक यांना विशेष मागणी आहे. दुकानांत मोदकाच्या खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. सणाच्या कालावधीत घरोघरी पाहुण्यांची वर्दळ असते. रोजच्या प्रसादात वैविध्य हवे, यासाठी विविध प्रकारचे मोदक देण्यात येतात. त्याचप्रमाणे अनेक कंपन्यांमध्येही गणपतीची स्थापना केली जाते. तेथे प्रसादासाठी मोदकांचा प्रसाद दिला जातो. अशा वेळी घरगुती पद्धतीने तयार झालेल्या मोदकांना विशेष पसंती असते. बाजारपेठेत विविध प्रकारचे मोदक उपलब्ध असून, दोन दिवसांपासून मोदकांची तुफान खरेदी होत आहे.