मोदींची आज राजस्थानमध्ये पहिली प्रचारसभा

0

जयपूर-विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. भाजप, कॉंग्रेसचे स्टार प्रचारक मैदानात उतरले आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदीआजपासून राजस्थानमध्ये प्रचाराची सुरुवाट करणार आहे. ते आज राजस्थानमध्ये पहिली प्रचारसभा घेणार आहे. सिंहद्वार अलवर येथे त्यांची आज सभा होत आहे.

उद्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी टेंपल रन येथून प्रचाराला सुरुवात करणार आहे. मारवाड येथून ते दौऱ्याला सुरुवात करणार आहे. उद्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुरुवातीला जगप्रसिद्ध अजमेर दरगाह येथे जाऊन प्रार्थना करणार आहे. त्यानंतर पुष्कर स्थित ब्रह्मा मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे. त्यानंतर प्रचाराला सुरुवात करणार आहे.