मोदींची मुलखात ‘फिक्स’; मानसिक पराभवाचे द्योतक-जितेंद्र आव्हाड

0

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीवरून मोदींवर विरोधकांकडून टीका होत आहे. दरम्यान यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखी मोदींना लक्ष केले आहे. गेल्या साडेचार वर्षात एकही मुलाखत न देता ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘फिक्स’ मुलाखत वाटत आहे. ही ‘फिक्स’मुलाखत मोदींच्या मानसिक पराभवाचे द्योतक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, अशी जहरी टीका आव्हाड यांनी केली आहे.

मी आजवर क्रिकेट सामने फिक्स असल्याचे ऐकले होते, पण हल्ली मुलाखतीही फिक्स असतात, अशा शब्दात त्यांनी या मुलाखतीवर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीत राम मंदिर, रिझर्व्ह बँकेचा वाद, जमावाकडून होणाऱ्या हत्या आदी मुद्द्यांवर भाष्य केले. या मुलाखतीवरुन जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन टीकास्त्र सोडले. या ट्विटबरोबरच त्यांनी फेसबुकवरूनही एक व्हिडिओ शेअर करत मुलाखतीवर भाष्य केले.

आपल्या ट्विटमध्ये आव्हाड यांनी ‘लहानपणी एक मुलगा बॅट- बॉल घेऊन यायचा आणि आम्हाला क्रिकेट खेळायला लावायचा. त्याला आवडेल त्याला बॉलींग करायला लावायचा. बॅटींग मात्र तो स्वतःच करायचा. बॉल जोरात टाकला तरी ओरडायचा’. असे सांगत क्रिकेट सामन्याप्रमाणे मोदींची मुलाखत देखील फिक्स आहे असे म्हटले आहे. गुजरात दंगलीतील मुस्लिमांच्या हत्येबाबत ते काहीच बोलत नाही. राफेल कराराबाबतही त्यांनी भाष्य करणे टाळले, याकडेही आव्हाड यांनी लक्ष वेधले.