लखनौ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा मायावतींनी एकदा टीकास्त्र सोडले आहे. २०१९च्या निवडणुकीत मोदी यांचा पराभव निश्चित असून त्यांची जहाज बुडत असल्याने संघाने देखील त्यांची साथ सोडली आहे. मोदींचे राजकारण पण संपुष्टात आले आहे अशी टीका मायावती यांनी ट्वीटरद्वारे केली आहे.
मोदींनी २०१४च्या निवडणुकीत देशातल्या लोकांना मोठी स्वप्न दाखवत सत्तेवर आले होते, दाखवलेले स्वप्न त्यांनी पूर्ण केली नाही. त्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला असून, त्यांनी भाजपापासून स्वताला दूर ठेवले आहे. देशाने आतापर्यंत मोदींना सेवक, मुख्यसेवक, चहावाला आणि चौकीदारच्या स्वरूपात पाहिले असून, आता देशाला सविधानावर आधारित मानसिकता असलेला पंतप्रधान पाहिजे असेही त्या म्हणाल्या आहेत.