बाबासाहेबांनी आधुनिक भारताचा पाया रोवला. सामाजिक, आर्थिक व वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला. बदलाची भावना सोडून समता, बंधुत्व रुजवण्याचा प्रयत्न केला, असे मोदी म्हणतात. हा 2017 च्या शतकातील सर्वात मोठा विनोद आहे. अर्थात गोबेल्सच्या कार्यपद्धतीप्रमाणे एक गोष्ट शंभरदा म्हटली तर खोट्याचे सत्यात रूपांतर होते. मोदी या रणनीतीचे गाडे अभ्यासक आहेत. आता बाबासाहेबांच्या नावाने मोठे केंद्र दिल्लीत बनवण्यात येत आहे. याला समरसता म्हणतात. आपल्या शत्रूंना आधी विरोध करायचा असतो, तरी तो मोठा झाला तर त्याला बरोबर घ्यायचे असते, नंतर आपलाच असल्याचे भासवायचे असते. जसे सरदार पटेलनी ठडडवर बंदी घातली. आता हेच लोक सरदार आपले असण्याचे भासवत आहेत.
ब्राह्मणांनी कुठलाही गुन्हा केला तर त्याला मृत्युदंड दिला जाऊ नये, हा मनुस्मृतीचा कायदा आहे. ज्यावेळी अफझल खानचा शिवरायांनी कोथळा काढला, त्यावेळी अफझल खानचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यांनी महाराजावर हल्ला केला. तू ब्राह्मण आहेस म्हणून कोण मुलाहिजा करतो म्हणत शिवरायांनी त्याचे मुंडके उडवले. या बाबीमुळे शिवरायांना प्रचंड विरोध झाला. पुजार्यांनी ठरवले की शिवराय शुद्र आहेत म्हणून त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. शिवरायांनी मग गागाभट्टाला काशीहून आणून राज्याभिषेक केला. शिवरायांचा पूर्ण खोटा इतिहास सांगून मुसलमानांना टार्गेट करतात. हे विसरतात की, सरदारांनी आणि पुजार्यांनीच शिवरायांना विरोध केला होता. दुसरीकडे 18 पगड जातींनी, शोषित समाजानी, हजारो मुसलमानांनी शिवरायांची भक्ती केली. जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला’ या तत्त्वावर शिवरायांनी, संभाजी महाराजांनी, बाबासाहेबांनी कृतीतून आपले स्थान निर्माण केले. म्हणूनच लाखो लोक त्यांना अभिवादन करतात. मी स्वत: 8000 मुस्लीम सैनिकांचे सैन्य काश्मीरमध्ये निर्माण केले. काश्मिरातील दहशतवाद आम्ही 2003 पासून 2010 पर्यंत संपवून टाकला. पण भाजपने मुफ्तीबरोबर भागीदारी करून काश्मीरला पुन्हा पेटवले.
ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करण्यासाठी भारतात आली. त्यांच्याशी लढणार्या टिपू सुलतानविरोधात त्यांनी हैदराबादचे निजाम आणि पेशव्यांना उभे केले. नंतर टिपू, निजाम आणि पेशव्यांना इंग्रजांनी नष्ट केले. त्याचप्रमाणे आज, सापनाथ काँग्रेसचा ऋऊख आणि नागनाथ भाजपचा मेक इन इंडिया, असे व्यापारी हत्यार तयार केले आणि मोन्सेन्टोसारख्या महाकाय बहुराष्ट्रीय उद्योगसमूहांना भारत विकण्याचा धंदा जोमाने सुरू केला. सर्व सरकारी उद्योगांचे खासगीकरण करा. आता हे लोक 1300 शाळा बंद करत आहेत. बाबासाहेब सांगतात, मोठ्या उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करा. सर्वात जास्त बाबासाहेबांशी दगाबाजी मनमोहन सिंगने केली. 1991 ला खाउजा धोरण आणून बाबासाहेबांचा विचार नष्ट करण्याची सुरुवात केली.
1991ला मी काँग्रेसचा खासदार झालो. राजीव गांधींना मारण्यात आले. कारण ते अमेरिकेचे कट्टर विरोधक होते आणि तंत्रज्ञानात भारताला स्वावलंबी बनवण्याचा विडा त्यांनी उचलला होता. नरसिंहराव/ मनमोहन सिंग यांनी खाउजा धोरण आणले. त्याला मीच काय पण 75% काँग्रेस खासदारांनी विरोध केला. म्हणून बाबरी मस्जिद नरसिंहरावनी पाडली. हिंदू-मुस्लीम नरसंहार केला. भारताचे सार्वभौमत्व संपवून टाकले. ठडड चा शत्रू मुसलमान कधीच नाही. मुसलमानाला टार्गेट केले की जातीमध्ये विभागलेला हिंदू एकसंघ होतो आणि हिंदू निर्माण झाल्यावर त्याचा प्रमुख ब्राह्मण होतो. हा केवळ वर्ण वर्चस्वाचा खेळ आहे. मनुस्मृती जाळण्याचे काम बाबासाहेबांनी केले. हिंदू शेतकरी आणि कामगारांना आत्महत्या करायला भाग पाडायचे. बाबासाहेबांनी मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयकरण करायला सांगितले. इकडे मोदीसाहेब तुम्ही म्हणतात खासगीकरण करा. बाबासाहेबांनी जइउ ना आरक्षण द्या, असा ठराव केला. त्यावेळी जइउमध्ये मराठा समाजसुद्धा होता. बाबासाहेबांनी मराठ्यांसाठी आरक्षण मागितले. पण आता हे लोक जइउ, डउ, मराठा यांच्यामध्ये फूट पाडून राज्य करत आहेत. खासगीकरण करून सरकारी नोकर्या संपवतात. म्हणजे अप्रत्यक्षरीत्या आरक्षण संपवतात. संरक्षण व्यवस्थेचे जागतिकीकरण करून भारतातील सुरक्षा व्यवस्थेला विकलांग करतात. कारगिल युद्धात वाजपेयी सरकारने सैन्याला सीमा पार करू दिली नाही. आपल्या सैन्याला समोरून हल्ला करायला लावले, त्या लढाईत माझे साथीदार मारले गेले. अमेरिकेच्या आदेशावर भारत सरकार काम करत आहे. मोदी, नवाज शरीफला मिठ्या मारतात. पाठीमागे अडाणी हसत असतो. मोदीसाहेब तुम्ही बोलता तसे कधीच वागत नाहीत. हेच तुमचे बाबासाहेबांचे प्रेम? फोकनाड थांबवा आणि बाबासाहेबांचे विचार कृतीतून दाखवा. जाती धर्माचे फोकनाड बंद करा. रोटी कपडा मकानचे राजकारण करा.
– ब्रिगेडिअर सुधीर सावंत
9987714929