सुजलपूर:पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक वेळी त्यांच्या भाषणात गांधी आणि नेहरू कुटुंबियांचा उल्लेख करतात. मोदींकडून सातत्याने गांधी-नेहरू कुटुंबियांवर टीका करतात. यावरून राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष केले आहे. मोदींच्या मनात माझ्या कुटुंबियांबद्दल द्वेष आहे, परंतु मी त्यांचा कधीही द्वेष करत नाही. मोदी माझ्या वडिलांबद्दल, आजी-आजोबांबद्दल वाईट बोलतात. परंतु मी त्यांच्यावर वैयक्तिक कधीही टीका करत नाही. त्यांना झप्पी लगावतो असे राहुल गांधी यांनी सांगितले. मध्य प्रदेशमधील सुजलपूर येथील प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींवर टीका केली.
नुकतेच मोदींनी राजीव गांधी यांच्यावर टीका केली होती. राजीव गांधी ह्यात नसतांना त्यांच्यावर टीका केल्याने मोदींवर टीका होत आहे. यावरून राहुल गांधी यांनी पलटवार केला.