मोदींच्या मुलाखतीत ‘मी’पणा दिसतो; राज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे जहरी टीका

0

मुंबई – १ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रसारित झालेल्या मुलाखतीचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला आहे. आज प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रामध्ये राज ठाकरे यांनी मोदींच्या मुलाखतीतील ‘मी’पणा आणि एककेंद्रितता दिसून येत असल्याची टीका केली आहे.

एक मनमोकळी मुलाखत! या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी हे स्वत:च स्वत:ची मुलाखत घेत आहेत. तसेच बोला काय विचारू? अशी विचारणा करत आहेत, असे दर्शवले आहे. आजूबाजूला मोदींचे परदेश दौरे, सरदार पटेल यांचा पुतळा, चीनमधील ड्रमवादन असे मोदीमय वातावरण चित्रित केले आहे. त्यातून मोदींचा मीपणा दर्शवला आहे.

या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींनी राफेल विमान करार, पाच राज्यातील निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव, शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, पाकिस्तान, सर्जिकल स्ट्राइक यांसह विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली होती.