मोदींच्या ‘योगा’ व्हिडीओवर ३५ कोटी खर्च!

0

नवी दिल्ली-काही दिवसांपूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनी पंतप्रधान मोदींचा योगासनाचा एक व्हिडीओ (फिटनेस व्हिडीओ) व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात विविध प्रतिक्रिया आल्या. काहींनी याची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडविली होती. देशातील प्रमुख प्रसार माध्यमांमध्येही हा व्हिडीओ अनेकदा दाखवण्यात आला. या व्हिडीओसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून ३५ लाख रुपये खर्च करण्यात आले, तसेच आंतरराष्ट्रीय योगदिनी जाहिरात आणि इतर गोष्टींसाठी तब्बल २० कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

काँग्रेसचे नेता शशी थरुर यांनी आपल्या नेहमीच्या अंदाजात या संकेतस्थळाच्या आधारे ट्विट करुन केंद्र सरकारवर निषाणा साधला. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनीही तातडीने त्यांना प्रत्युत्तर दिलं. शशी थरुर यांनी ट्विट करुन,’ योगदिनी जाहिरातींवर २० कोटी रुपये खर्च आणि मोदींच्या फिटनेस व्हिडीओसाठी ३५ लाख रुपये खर्च केला, हे लाजिरवाणं आहे. हे सरकार केवळ दिखावा करणारं सरकार आहे’ असे म्हटले आहे.

थरुर यांच्या या आरोपावर राज्यवर्धन सिंह राठोड यांनीही तातडीने प्रत्युत्तर दिलं. आदरणीय शशी थरुरजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओसाठी काहीही खर्च करण्यात आलेला नाही. पंतप्रधान कार्यालयातील व्हिडीओ ग्राफरनेच तो व्हिडीओ चित्रीत केला आहे. त्या संकेतस्थळाने छापलेलं वृत्त धाधांत खोटं आहे, या व्हिडीओसाठी एक रुपयाही खर्च करण्यात आलेला नाही, ३५ लाखांची गोष्ट तर सोडून द्या. या मुद्यावरुन सध्या सोशल मीडियावर वातावरण तापलं असून शशी थरुर आणि राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या ट्विटर अकाउंटवर युजर्सच्या विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.