मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची पहिलीच सभा घेत आहे. दरम्यान त्यांच्या सभेला गर्दी नसल्याने बोलले जात आहे. यावरूनच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली आहे. वर्ध्यातील सभेला गर्दी नसल्याने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे अशी टीका मुंडेंनी केली आहे.
२०१४साली दिलेल्या आश्वासनांचा कित्ता गिरवून सत्तेची आस लावून घेण्यात अर्थ नाही हे त्यांनी जाणावे. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांचा चढता आलेख पाहता कुंभकर्ण कोण ते स्पष्टच आहे.
आदरणीय शरद पवार यांच्या कुटुंबाची आणि राष्ट्रवादीची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करू नये. गडकरी यांनी पंतप्रधानांबद्दल काही दिवसांपूर्वी काय वक्तव्य केले हे सर्वज्ञात आहे. आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची पंतप्रधानांनी काय स्थिती करून ठेवली आहे याकडे प्रथम लक्ष द्यावे असे धनंजय मुंडे यांनी ट्वीट केले आहे.