बीड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळी येथील सभेचा बंदोबस्त आटोपून पोलिसांचे एक पथक पोलीस व्हॅनने बीडकडे परत जात असताना सिरसाळा परिसरात व्हॅन पलटी होवून अपघात घडला. या अपघातात चालक गंभीर जखमी असून 12 ते 15 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याचवेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा ताफा परळीकडे येत होता. त्यांना अपघाताची माहिती मिळताच जखमी पोलिस कर्मचार्यांना बाहेर काढून उपचारासाठी पाठविले.
मोदींच्या सभेसाठी अतिरीक्त सुरक्षेसाठी मागवलेले पोलिस कर्मचारी, पोलिस मुख्यालय बीड कडे परत जात असताना त्यांच्या व्हॅनला सिरसाळा परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होवून अपघात झाला.